Khandoba Mandir Champa Shashti Utsav | खंडोबाचा नवरात्र उत्सव साजरा | Pune | Sakal Media<br />कसबा पेठ, शिंपी आळी येथे शिवकालीन खंडेरायाचे मंदिर आहे. हे मंदिर खेडजवळच्या दावडी निमगांवचे ठाण म्हणून पूर्वापार हे स्थान ओळखले जाते. खंडेराया, म्हाळसा आणि बाणाईच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या मूर्तीसमोर चौकोनी आकाराचे शिवलिंग आहे. मंदिराच्या गाभा-यातील कोनाड्यात गणपती व दास मारूती याच्या छोट्या मुर्ती आहेत. अशा प्रकारच्या मूर्ती असणारे बहुधा हे एकमेव मंदिर असावे अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक संदिप लचके यांनी दिली. (Champa Shashti Utsav Khandoba Mandir) मल्हारी मार्तड खंडोबा देवस्थानच्या वतीने गुरूवार दि. ९ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला.<br />#khandobanavratri #ChampaShashtiUtsav #KhandobaMandir #Pune #ChampaShashtiUtsavKhandobaMandir